इगतपुरीनामा न्यूज – विधान परिषदेचे माजी आमदार जयंत जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून कुऱ्हेगाव ता. इगतपुरी येथे समाज कल्याण विभागामार्फत १० लाख किमतीच्या पेव्हर ब्लॉक कामाचे भूमिपूजन कुऱ्हेगाव ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच भाऊसाहेब धोंगडे यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील ग्रामस्थांचे अधिकाधिक सहकार्य मिळाल्यास अनेक विकास कामे करता येतील. आगामी काळात गावाचा कायापालट करण्यासाठी सर्वांच्या मदतीने पाठपुरावा करणार असल्याचे भाऊसाहेब धोंगडे यांनी यावेळी सांगितले. ग्रामस्थांच्या मागणीनुसार गावासाठी कामे करण्यासाठी सरपंच आणि ग्रामपंचायत सक्रिय असून सर्वांना याचा अभिमान वाटतो असे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य जितू पवार, माजी उपसरपंच बाळू धोंगडे, सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब सुरेश धोंगडे, उपसरपंच नामदेव धोंगडे व ठेकेदार बोरसे व त्यांचे सहकारी तसेच कुऱ्हेगाव येथील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group