शहापूर गेवराई व संगमनेर तोलरखिंड या राज्य महामार्गाच्या कामाला निधी मिळावा : भाजपा सोशल मीडिया सेल उत्तर नगर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे पाटील यांची मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८

अहमदनगर, ठाणे, बीड जिल्ह्याच्या पर्यटन वाढीच्या दृष्टीने महत्वाचा असणारा शहापूर गेवराई व संगमनेर तोलरखिंड या राज्य महामार्गाच्या कामाला निधी मिळावा अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांना निवेदन देऊन भाजपा सोशल मीडिया सेल उत्तर नगर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे पाटील यांनी केली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका सरचिटणीस हरिभाऊ फापाळे यावेळी उपस्थित होते.

ना. गडकरी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पर्यटनाच्या दृष्टीने राज्य महामार्ग ४४ गेवराई जिल्हा बीड ते शहापूर जिल्हा ठाणे व राज्य महामार्ग ४६ संगमनेर- कोतुळ तोलारखिंड या रस्त्यांना निधी मिळावा. राज्य महामार्ग ४४ गेवराई- शहापूर या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. हा महामार्ग होणे अतिशय आवश्यक आहे. हा रस्ता पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. जगप्रसिद्ध साईबाबा, शनी शिंगणापूर, संत भगवान बाबा, अगस्ती महाराज अशी देवस्थान तर जगप्रसिद्ध सांदण दरी, सर्वांत उंच शिखर कळसुबाई, नाथसागर, भंडारदरा, निळवंडे अशी धरणे आहेत. काजवा, फुल मोहत्सव पर्यटकांना आकर्षित करतील. यामुळे पर्यटन वाढीस लागेल.

मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकणला जोडणारा व मुंबईला जाण्यासाठी जवळचा मार्ग होईल. शहापूर, अकोले, संगमनेर, राहता, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव गेवराई या तालुक्यांतील नागरिकांना उपयोग होईल. अकोले तालुक्यातील रा.म. ४६ हा अकोले तालुक्यातील संगमनेर – कोतुळ – तोलरखिंड असा महामार्ग असून या रस्त्याची अतिशय दुर्दैवी अवस्था झाली आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हाही रस्ता महत्वाचा आहे. हरिश्चंद्रगड, अलंगगड, मलंगगड, यासारखे १० गड किल्ले, मुळा नदीचा उगम व अनेक छोटी धरणे असून अतिशय निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर आहे.पर्यटनाच्या दृष्टीने हे रस्ते होणे आवश्यक आहे. अकोले तालुक्यातील आदिवासी युवकांना रोजगार उपलब्ध  होईल. अकोले तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरावस्था दूर होईल असेही निवेदनात म्हटले आहे. ना. नितीन गडकरी यांनी निवेदनानुसार सकारात्मक भूमिका घेऊ असे सांगितले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!