“आनंदवन”मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १४ – विश्वसूर्य महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवराय यांच्या कार्याच्या आदर्श घेतल्यास सक्षम आणि सदृढ पिढीचे निर्माण होईल. ह्या महापुरुषांमुळे अखंड भारत आणि महाराष्ट्र राज्य निश्चितच उत्तमोत्तम प्रगती साधू शकते. सामाजिक एकात्मता जपण्यासाठी आणि भावी पिढीला एकत्र करण्यासाठी सर्वच महापुरुष प्रेरणादायी आहेत असा सुर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त उमटला. इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील आनंदवन सोसायटीमध्ये प्रचंड उत्साहात जयंती उत्सव संपन्न झाला. गोंदे दुमाला औद्योगिक वसाहत ग्रामपंचायतीचे सरपंच शरद सोनवणे, आनंदवन सोसायटीचे नागरिक बौद्धाचार्य राजू उबाळे, दशरथ आहेर, भास्कर सोनवणे, राजश्री उबाळे, माया सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी लहांगे बाबा, रघुनाथ गुळवे, महेंद्र पवार, समाधान तपासे, गौतम नरवाडे, कोकणे, धोंगडे, गोहिरे, तुपे, मुसळे, त्रिभुवन आदींनी महापुरुषांना विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना गोडधोड पदार्थांचे वाटप करण्यात आले. सामाजिक एकोपा जपून नागरिकांनी देशाचे हित जोपसावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Similar Posts

error: Content is protected !!