

इगतपुरीनामा न्यूज – वाडीवऱ्हेकडून अस्वलीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने बेलगावकडून वाडीवऱ्हेकडे येणाऱ्या मॅक्झिमो गाडीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. ह्या अपघातात बेलगाव कुऱ्हे येथील ३ जण गंभीर तर ४ जण किरकोळ जखमी झाले. सकाळी ९ वाजता झालेल्या ह्या अपघातात दत्तू लालू गुळवे वय ३८, मंगला विठ्ठल शिंदे वय ३२, मनीषा एकनाथ शिंदे वय ३५, तुषार सावळीराम गवारी वय १२,रेखा सावळीराम गवारी वय २५, लक्ष्मी खंडू गवारी वय २५, सविता सुनील साळवे वय ३५ हे जखमी झालेले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेकेने समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.