बलायदुरी येथे घराला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी येथे सकाळी दहाच्या सुमारास घराला आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे घरमालकांनी सांगितले. ह्या आगीत नव्या घराच्या बांधकामासाठी आणलेली रोख रक्कम ५ लाख रुपये, ४ तोळे सोने, जीवनावश्यक वस्तू, भांडे, कपडे आदी भस्मसात झाले. एकूण १० ते १२ लाखांची नुकसान झाल्याचा दावा घरमालकांनी केला आहे. ह्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बलायदुरी ता. इगतपुरी येथील कैलास लुक्कड भगत हे आपल्या परिवारासह गावी राहतात. त्यांच्या नव्या घराचे बांधकाम सुरू आहे. आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या घराला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे कैलास भगत यांनी सांगितले. इगतपुरी महिंद्राच्या सिक्युरिटी डिपार्टमेंटचे कैलास ढोकणे, सिक्युरिटी व्यवस्थापक जयंत इंगळे, ड्युटी ऑफिसर सयाजी जाधव, सेफ्टी ऑफिसर सुनिल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली फायर ऑफिसर हरीश चौबे यांनी सिक्युरिटी सुपरवायझर महेंद्र भटाटे, फायर सेन्ट्री मनोज भडांगे, पोपट गटखळ यांच्या पथकाने आग आटोक्यात आणली.
घरमालक कैलास लुक्कड भगत यांनी सांगितले की, शॉर्टसर्किटमुळे घराला ही आग लागली. घराच्या बांधकामासाठी स्वतःचे आणि कर्जाऊ आणलेले रोख पाच लाख रुपये, 4 तोळे सोने, कपडे, अन्न धान्य आदी साहित्य आगीत भस्मसात झाले. ह्या आगीमुळे 10 ते 12 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.