इगतपुरीनामा न्यूज, दि. २
अखिल भारतीय ओबीसी महासभा महाराष्ट्र राज्य मिडिया प्रभारी पदी प्रशांत अहिरराव यांची नुकतीच करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष ऍड. रघुनाथ महाले यांच्या स्वाक्षरीने अहिरराव यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
ओबीसी आरक्षण संदर्भात महाराष्ट्र राज्य आयोजित बैठकीत त्यांची निवड करण्यात असून फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा आणि संघटनेची ध्येय धोरणे तळागाळातील ओबीसी समाजापर्यंत प्रामाणिकपणे पोहचवण्याचे काम प्रामाणिकपणे करेल अशी ग्वाही अहिरराव यांनी दिली. ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढत आलो आहे आणि यापुढेही ओबीसी आरक्षणासाठी लढा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र संघटक सरचिटणीस शशिकांत घुगे, विभागीय अध्यक्ष गौरव वाघ, महिला नाशिक जिल्हाध्यक्ष विद्या घायतडकर आदी उपस्थित होते.