ज्ञानेश्वर मेढेपाटील, इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार ह्या पूर्वनियोजित आरोग्य शिबीरासाठी जात असताना हरसुल ग्रामीण रुग्णालयाजवळ ग्रामस्थांनी व भाजपा पदाधिकाऱ्यांकडून फटाक्याची आतिषबाजी करत त्यांचे स्वागत केले. यावेळी हरसुलचे युवा नेते मिथुन राऊत, विनायक माळेकर, जेष्ठ नेते भिवा पाटील महाले, हरसुलचे उपसरपंच राहुल शार्दुल यांनी हरसुल ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा अशी मागणी केली. अपुरा असलेला कर्मचारी वर्ग आणि तज्ञ डॉक्टरांची तातडीने नेमणूक करावी आदी मागण्यांचे निवेदन हरसूल ग्रामपंचायतीने भाजपा तालुका कार्यकारिणीतर्फे दिले.
यावेळी मिथुन राऊत, विनायक माळेकर, राहुल शार्दुल, नितीन देवरगावकर, हिरामण गावित, जयराम भुसारे, पावन बोरसे, सतीश दुसाने, कौशल्या लहारे, लता राऊत, विष्णू बेंडकोळी, शिवसेना गणप्रमुख विठ्ठल पवार, अंबादास बोरसे, योगेश आहेर, युवा सेना उपतालुकाप्रमुख रघुनाथ गांगोडे आदींसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हरसूल हा परिसर अतिदुर्गम आदिवासी भाग असल्याने येथे उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती व्हायला हवी यासाठी केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी केली. त्यांनी सकारात्मक पावले उचलून ह्यावर सर्वंकष निर्णय घेऊ असे सांगितले.
- मिथुन राऊत, युवानेते हरसूल