इगतपुरी तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा : इंदिरा काँग्रेसचे प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदन

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात ह्यावर्षी पावसाने लवकरच पाठ फिरवली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या भात पिकासह, नागली, वरई, भुईमुग आदी पिकांना याचा मोठा फटका बसला आहे शासनाने दखल घेऊन इगतपुरी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा आदी मागण्यांचे निवेदन इंदिरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव, शेतकरी नेते पांडुरंग शिंदे, रामदास मालुंजकर यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरीचे प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे व इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांना देण्यात आले. इगतपुरी हा अतिपर्जन्याचा तालुका म्हणून ओळख होती. मात्र ह्यावर्षी सुरवातीपासूनच पावसाचे प्रमाण चिंताजनक झाल्याने शेतकऱ्यांना भात बियाणांची दुबार पेरणी करावी लागली. अनेक संकटांना तोंड देत भात पिकासह इतर खरीप पिकांची लागवड केली. मात्र पाऊस गायब होऊन कडक उन्हाचा चटका बसु लागला आहे. यामुळे भात शेतीसह अन्य पिकेही उभी वाळून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी सर्वच शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवला होता मात्र विमा कंपनीने खोटे व अपूर्ण पंचनामे करून शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही.

पीएम किसान योजनेसाठी शेतकऱ्यांना बँकेत ईकेवायसी करतांना बरेच अडथळे निर्माण होत आहेत. याबाबत बँक अधिकाऱ्यांनाही सुचित करावे, अँड्रॉईड मोबाईलद्वारे पीक पाहणी करतांना अनेक अडचणी येत असल्याने पीक पाहणीसाठीही मुदतवाढ द्यावी, कडक उन्हाच्या तडाख्यात पिके करपण्याची शक्यता असल्याने इगतपुरी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी निवेदनात आहे. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव, शेतकरी नेते पांडुरंग शिंदे, जेष्ठ नेते रामदास मालुंजकर, खरेदी विक्री संघाचे व्हॉइस चेअरमन जयराम धांडे, किसान काँग्रेसचे सुदाम भोर, देवराम मराडे, कचरू शिंदे, किसन शिंदे, सुरेश धोंगडे, परशराम नाठे, संजय शिंदे,  विठ्ठल शिंदे, ॲड. गणपत चव्हाण, सत्तार मणियार, सविता पंडित, सायली शिंदे, रामदास भोसले, तुकाराम शिंदे, बाळासाहेब धुमाळ, बाळासाहेब कुकडे, भास्कर कातोरे, काशिनाथ तांबे, मुरलीधर धोंगडे, तुकाराम सहाणे, संपत धोंगडे, अनिल वाजे, नवसु खडके आदी काँग्रेस पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!