
इगतपुरीनामा न्यूज – मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत इगतपुरी येथील श्री जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने इगतपुरी पोलीस ठाण्यात रक्षाबंधन उत्सव संपन्न झाला. इगतपुरी शहर आणि परिसरातील गुन्हेगारीचा बिमोड करून नागरिकांसह महिला भगिनींना सुरक्षित करणारे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सोपान राखुंडे आणि सर्व पोलीस बांधवांना राखी बांधण्यात आली. यावेळी माजी सैनिक हरीश चौबे, प्रकाश जगदाळे, प्रकाश शिंदे, श्रावण फासगे ह्या बांधवांना महिलांनी राखी बांधली. यापुढेही सर्वांचे रक्षण करण्यासाठी बांधील आहोत अशी प्रतिक्रिया पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि माजी सैनिकांनी दिली. यावेळी श्री जनसेवा प्रतिष्ठानच्या मीनाक्षी आहेर, मनीषा फलटणकर, डॉ. चैताली बागल, जयश्री चव्हाण, सविता भराडे, कु. किर्ती फलटणकर, किरण फलटणकर, ताराचंद भरिंडवाल, सुनील आहेर, पत्रकार शैलेश पुरोहित, सुधीर कांबळे, डॉ. प्रदीप बागल, माणिक भरिंडवाल आदी उपस्थित होते.