कवी : नारायण दादासाहेब गडाख
शिक्षक : न्यू इंग्लिश पंचाळे, ता. सिन्नर
गोळी झेलता छाताडावर
मनी हुंदका दाटला
कल्पतरू हा कुटुंबाचा
कंठी हृदयी रडला
बालपणीचा सवंगडी हा
सिमेवरती गेला
सैनिक म्हणतो आपण याला
देशासाठी लढला
आई केविलवाणा धावा करी
दिवा वंशाचा गेला
पत्नी विधवा होते याची
पहा शहीद हा झाला
गोजिरवाणा माझा बाळ
कसा सोडूनी गेला
आठवणींचा हा हिंदोळा
मागे ठेवूनी गेला
अमर निशाणी ही गावाची
ठसा उमटूनी गेला
तरुण पिढीला देशभक्तीचा
संदेश देऊनी गेला