
इगतपुरीनामा न्यूज – धामणी येथे समृद्धी महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात सुरुंग लावून ब्लास्टींग केले जात आहे. यामुळे येथील अनेक घरांना मोठे तडे गेले असुन अनेक घरांची पडझड झाली आहे. समृद्धीचे काम करणाऱ्या कंपनीकडुन भरपाई मिळण्यासाठी काँग्रेसचे उत्तमराव भोसले व धनंजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवसांपासून धामणी ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरु केले होते. आज तिसऱ्या दिवशी एमएसआरडीसीचे सातपुते, पोलीस उप अधिक्षक सुनिल भामरे, तहसीलदार अभिजीत बारावकर, पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी मध्यस्थी करत कंपनीच्या अधिकाऱ्यांना उपोषण स्थळी बोलावुन घेतले. ब्लास्टींगमुळे सर्व घरांच्या झालेली नुकसान भरपाई देण्यात येईल. ब्लास्टींग करतांना ग्रामस्थांना विश्वासात घेतले जाईल या लेखी आश्वासनानंतर तात्पुरत्या स्वरूपात उपोषण स्थगित करण्यात आले. उपोषणावेळी उत्तमराव भोसले, धनंजय भोसले, दिलीप भोसले, नारायण गोरख भोसले, दिलीप भोसले, अशोक भोसले, सुदाम भोसले, संदीप भोसले, शरद भोसले, गणेश भोसले, अरुण पगारे, त्र्यंबक भोसले सहभागी होते. उपोषणस्थळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, माजी जि. प. सदस्य उदय जाधव, सुनिल वाजे, वामन खोसकर, शिवसेना शिंदे गट उपजिल्हाप्रमुख रघुनाथ तोकडे, बाजार समितीचे संचालक दिलीप चौधरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, माजी उपसभापती पांडुरंग वारूंगसे यांनी भेट दिली.