शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेची २९ वी दुर्गसंवर्धन मोहीम

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१
शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेचे २९ वी दुर्गसंवर्धन मोहीम पालघर जिल्ह्यातील कोहोज किल्ला येथे पार पडली. या मोहिमेमध्ये किल्ल्याच्या माचीवर असलेल्या शिवमंदिराच्या परिसरात स्वच्छता करण्यात आली, तसेच बालेकिल्ला येथे असलेले बाल हनुमान मंदिर परिसर, अवतीभवती असलेल्या  ९ पाण्याच्या टाक्‍या, त्यात पडलेल्या पाण्याच्या बाटल्या प्लास्टिकचे ग्लास आणि प्लास्टिक पत्रावळी, द्रोण जमा करून किल्ले परिसर स्वच्छ करण्यात आला, अमित पाटील, विशाल जाधव, मयुर बडवे, चेतन पाटील, गणेश पाटील, प्रशांत भोईर, किरण ठाकरे, अति सावंत, प्रसाद पाटील, कुणाल पाटील, चिन्मय पाटील, निशांत पाटील, सुरज पाटील, आकाश पाटील आणि शाम गव्हाणे यांनी स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

महाभारत कालीन वांजोळे येथील मंदिराचे संवर्धन करावे

इगतपुरी तालुक्यातील वांजोळे गावातील वैतरणा नदीच्या तीरावर महाभारत काळातील कालखंडामध्ये शिवमंदिर बांधण्यात आले होते. महाभारत काळात या मंदिराची निर्मिती झाल्याचा इतिहास गावातील जेष्ठ नागरिक सांगततात. 1964 मध्ये वैतरणा बांधल्याने वांजोळे गाव पाण्याखाली आले. ह्या गावाचे स्थलांतर शेजारील उंच भागावर करण्यात आले असले तरी मंदिर पुरातन असल्यामुळे त्याचे स्थलांतर त्या काळात न झाले नाही.
56 ते 57 वर्षापासून हे मंदिर पाण्याखाली असून जेव्हा पाण्याची पातळी कमी होते तेव्हा हे मंदिर पहावयास मिळते. मंदिर पाण्यात राहून बऱ्याच प्रमाणात मंदिराचा मागचा गाभारा खचून गेलेला आहे. मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. आज ह्या मंदिराचा पुढचा भाग जेमतेम आठ नऊ थांबा वर शिल्लक आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार करणे खूप गरजेचे असून त्याचे स्थलांतर करून वांजोळे गावात या मंदिराची स्थापना करावी. तरच हा आपला ऐतिहासिक वारसा जतन होईल असे शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेचे शाम गव्हाणे, विजय महाले, विजय दराने यांनी कळवले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!