युरिया खतांबाबत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूटमार थांबवा : वंचित बहुजन आघाडीचे इगतपुरीच्या तहसीलदारांना निवेदन

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील कृषी साहित्याचे विक्रेते युरिया खत नसल्याचे भासवून चढ्या भावाने शेतकऱ्यांची लूटमार करीत आहेत. त्यांना सरकारी दराने युरिया खताची विक्री करण्याचे आदेश देण्यात यावे, दुकानांची अचानक तपासणी करावी. दुकानाच्या बाहेर खते बी बियाणे, औषधे यांचे दरपत्रक, शिल्लकसाठा यांचा फलक लावावा आदी मागण्यांचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विक्रम जगताप, तालुका निरीक्षक दादाभाऊ शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरीचे निवासी नायब तहसीलदार प्रवीण गोंडाळे यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांना आपल्या पिकांसाठी युरिया खतांची आवश्यकता आहे. मात्र कृषी दुकानदार हे शेतकऱ्याना युरिया खत शिल्लक नसल्याचे सांगून दिशाभूल करतात. दुकानदारांकडे युरिया खतांचा साठा शिल्लक असला तरी खतांची विक्री सरकारी रकमेपेक्षा जास्त भावात विक्री करून शेतकऱ्यांची लूटमार करतात. युरिया खते घेताना इतर रासायनिक खतांचा किंवा औषधांचा उपयोग नसतानाही शेतकऱ्याना बळजबरीने घेण्यास सांगतात. यामुळे शेतकऱ्याना परवडत नाही. ह्या मागण्यांची दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर वंचित आघाडीचे अध्यक्ष तालुकाध्यक्ष विक्रम जगताप, सरचिटणीस मिलिंद शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष भरत बुकाणे, भारिपचे जेष्ठ नेते रमेश पंडित, तालुका उपाध्यक्ष एन. के. सोनवणे, इगतपुरी शहराध्यक्ष सचिन चोपडे, तानाजी सोनवणे, मधुकर बागुल, महिला आघाडीच्या नीता सोनवणे, अर्चना चिकने, मोडाळे उपसरपंच विठ्ठल जगताप, नटराज भडांगे, बाळू पंडित, तानाजी सोनवणे, मधुकर बागुल,  शांताराम भरीत, सुनील  चंद्रमोरे, राहुल पवार, सुनील पगारे, गौतम शिंदे, शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख बाळासाहेब धुमाळ आदींच्या सह्या आहेत.

Similar Posts

error: Content is protected !!