रायगडनगर भागातील अपघातात वाडीवऱ्हेचे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी : नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेकडून तत्परतेने जखमीला रुग्णालयात दाखल

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावरील रायगडनगर भागात अज्ञात वाहनाने कट मारल्याने अपघात झाला. ह्या अपघातात बुलेटवरून नाशिकहुन वाडीवऱ्हेकडे येणारे वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी लहू सुरेश भावनाथ वय ३२ हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमी लहू भावनाथ यांना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. मुंबई आग्रा महामार्गावर बेधुंद वेगात प्रवास करणारी वाहने वाढली असून त्यांच्यावर अंकुश आणण्यासाठी जागोजागी स्पीड कॅमेरे बसवणे आवश्यक आहे. अपघातांमुळे सामान्य माणसांचा जीवन टांगणीला लागत आहे. म्हणून अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाय करावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

स्पीडनेट इंटरनेट सोल्यूशन्स

इगतपुरी आणि घोटी मध्ये हाय स्पीड इंटरनेट, वायफाय सेवा

संपर्क साधा - 94222 14143
https://maps.google.com/?cid=8651594604110889001&entry=gps

Similar Posts

error: Content is protected !!