स्वातंत्र्यदिनी बलायदुरी येथे रस्त्यात भात लागवड करून संतप्त ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन

इगतपुरीनामा न्यूज – बलायदुरी गावात पारदेवीकडे जाणाऱ्या रस्त्याची  चिखलमय अवस्था आहे. येथून हॉटेलकडे जाणाऱ्या वाहनांमुळे अधिकच रस्ते खराब झाले. रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी बांधकाम खाते दाद देत नसल्याने माजी सरपंच कैलास भगत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आज स्वातंत्र्यदिनी रस्त्यात भात लागवड केली. बलायदुरी ता. इगतपुरी  येथील गुडघाभर चिखल असणाऱ्या गावातील रस्त्यात चक्क भाताची लागवड करून अनोख्या मार्गाने संताप व्यक्त केला. स्वयंस्फूर्तीने ग्रामस्थांनी शेतकरी आघाडी तालुकाप्रमुख माजी सरपंच कैलास भगत यांच्या नेतृत्वाखाली उग्र भाषेत निषेध करून भात लागवड केली. इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी गावामध्ये गावातील रस्ते खराब झाले आहेत. दुरुस्तीसाठी वारंवार प्रयत्न करूनही अधिकारी दाद देत नाही. येथील हॉटेलकडे जाणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. यामुळे रस्त्यांवर गुडघाभर चिखल तयार होतो. ग्रामस्थांना चिखलातून जावे लागते. यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य कमालीचे बिघडून साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. अधिकाऱ्यांचे वाढते दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरवर्षी हीच समस्या गावाच्या पाचवीला पुजलेली असल्याने कैलास भगत यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी चिटणीस निवृत्ती भगत, लक्ष्मण भगत, काळू गटकळ, देवराम भगत, लहू नाठे, प्रकाश भगत, परम दालभगत, महादेव भगत, ज्ञानेश्वर दालभगत, अविनाश भगत, वासुदेव गटकळ, गिताबाई गटकळ, संगीता नाठे, सरला भगत, मुक्ता भगत, रेणुका भगत, रंजना भगत आदी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली गावातील रस्त्यावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चक्क भात लागवड (आवणी ) करत संताप व्यक्त केला.

Similar Posts

error: Content is protected !!