शिक्षणाची गोडी लावणारे राज्य आदर्श शिक्षक सिद्धार्थ सपकाळे यांना गावकऱ्यांकडून मिळाला ध्वजारोहनाचा सन्मान

इगतपुरीनामा न्यूज – स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात लोकप्रतिनिधी आणि अन्य राजकीय व्यक्ती दरवर्षी ध्वजारोहन करून मान मिळवत असतात. मात्र ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांना बहुतांशी ठिकाणी कधीही हा सन्मान दिला जात नाही. अशा परिस्थितीत तीन वर्षाच्या काळात गावातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये मौलिक योगदान देणाऱ्या सिद्धार्थ सपकाळे यांना आज टिटोली येथील ध्वजारोहन करण्याचा सन्मान देण्यात आला. महाराष्ट्र शासन राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक सिद्धार्थ सपकाळे यांच्याकडून समारंभाची तयारी करीत असतांना शालेय व्यवस्थापन समितीकडून अचानक ध्वजारोहणाचा मान मिळाला. २०१९ मध्ये पदवीधर शिक्षक म्हणुन आतापर्यंत विद्यार्थ्याना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा एकच ध्यास असणाऱ्या शिक्षकाच्या कार्याला सलाम करण्यासाठी गावकऱ्यांनी हा सन्मान दिला अशी माहिती शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा उपसरपंच अनिल भोपे, सदस्य तानाजी बोंडे, भरत हाडप, कोंडाजी बोंडे, रूख्मिणी भटाटे, मोनाली राऊत, चव्हाणताई, बन्सी शिंगोळे, गुरुनाथ बोंडे, मंगलदास बोंडे यांनी दिली.

Similar Posts

error: Content is protected !!