
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील खेड येथील शासकीय आदिवासी माध्यमिक आश्रमशाळेत ७७ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुमन वाजे व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगवान पारधी यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. या कार्यक्रमाप्रसंगी खेडचे पोलीस पाटील अंकुश वाजे, सरपंच, उपसरपंच, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पालक, जिल्हा परिषद शाळा शिक्षक वृंद, खेड शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक नवनाथ सानप, शिक्षक परसराम भोसले, प्रदीप यनगुलवार, राजेंद्र गायकवाड, सुधीर कर्डिले, अधीक्षक अविनाश मिस्तरी, क्रीडा शिक्षक भिवा भांडकोळी, कला शिक्षक विनोद जमधडे, प्रतिभा काळे, लक्ष्मी पगारे, कविता शिरसाठ, अंजली भावसार, श्वेता दौंडे, सर्व शालेय कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.