लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १४
तापमानात होत असलेली वाढ, बदललेले निसर्गचक्र, अनियमित पर्जन्यमान, अतिवृष्टी आणि दुष्काळ या माध्यमातून निसर्ग प्रत्येकाला अस्तित्वाची जाणीव करून देत आहे. पर्यावरणाचे असंतुलन आणि वाढते प्रदूषण याला आळा घालण्यासाठी वृक्ष लागवड करणे काळाजी गरज असल्याचे प्रतिपादन घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी केले. खंबाळे येथे समृद्ध फाउंडेशनच्या मदतीने घोटी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले यांनी वृक्ष जतन करण्याचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमासाठी पोलीस हवालदार बोराडे, कोठुळे दादा, पोलीस कॉन्स्टेबल बस्ते, गायकवाड, शिंदे, सुहास गोसावी आदी पोलिसांनी अथक परिश्रम घेतले. शासनाच्या महत्वपूर्ण मोहिमेअंतर्गत विविध प्रजातींची मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली आहे. पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. यासाठी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक स्तरातील सर्वच व्यक्तींनी सहभाग नोंदवला पाहिजे असेही घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. खेडकर म्हणाले.