मुकणे सोसायटीच्या चेअरमनपदी जगन राव, व्हॉइस चेअरमनपदी काळु आवारी यांची निवड : दोन्ही पॅनलकडे समसमान संख्याबळ असल्याने चिठ्ठीद्वारे झाली निवड

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. २२

संपुर्ण इगतपुरी तालुक्याचे लक्ष लागुन असलेल्या मुकणे विविध सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी जगन राव तर व्हॉइस चेअरमनपदी काळु आवारी यांची चिठ्ठी पद्धतीने निवड झाली. अति संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मुकणे सोसायटी निवडणुकीत मतदारांनी अष्टविनायक व नम्रता पॅनलला प्रत्येकी ६-६ जागेवर निवडुन दिल्यानंतर चेअरमनपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागुन होते. यावर अनेकदा बैठका होऊनही चेअरमनपदासाठी एकमत होत नसल्याने आज इगतपुरी येथे चेअरमन व व्हॉइस चेअरमनपदासाठी निवडणुक घेण्यात आली. विहित वेळेत दोनही पॅनलकडून दोनही पदांसाठी प्रत्येकी दोन-दोन अर्ज दाखल करण्यात आले होते. सुरवातीला घेण्यात आलेल्या निवडणूकीत उभय उमेदवारांना समसमान मते पडल्याने चिठ्ठीद्वारे निवड घेण्यात आली. त्यानुसार चेअरमनपदी जगन राव तर व्हॉइस चेअरमनपदी काळु आवारी यांच्या नावांची चिठ्ठीद्वारे निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

यावेळी कचरू शिंदे, जगन राव, गणेश राव, निलेश चोरडिया, गजीराम राव, जयराम राव, नाना राव, विष्णु वेल्हाळ, काळु आवारी, पांडुरंग उबाळे, चंद्रभागा आवारी, आशा बोराडे आदी संचालक उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शशांक पगार, योगेश खरात, सचिव देविदास नाठे यांनी काम पाहिले. घोटी बाजार समितीचे माजी संचालक विष्णु राव, माजी सभापती गणपत राव, सरपंच हिरामण राव, उपसरपंच भास्कर राव, पोपट राव, रामभाऊ राव, भाऊसाहेब आवारी, पोपट राव, नागेश आवारी, खंडू राव, मिनीनाथ गुळवे, ज्ञानेश्वर राव, मोहन बोराडे, रामनाथ राव, रोशन राव आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!