उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ६३ मोफत सायकली ; ६३०० झाडांचे वृक्षारोपण : राष्ट्रवादीचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके यांच्या संकल्पनेतून झाला कार्यक्रम

इगतपुरीनामा न्यूज – राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनिर्वाचित कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके यांच्या माध्यमातून इगतपुरी तालुक्यासह मोडाळे परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके हे गटाचे विकसनशील युवा नेतृत्व असून अनेक सामाजिक बांधीलकी जपत गोरगरिबांना कायमच मदत करीत असतात. विकासाचे महामेरू उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या ६३ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून गोरगरीब विद्यार्थ्यांना गोरख बोडके स्वखर्चाने ६३ सायकली वाटप केल्याने त्यांचे आभार मानण्यात आले. या कार्यक्रमांतर मोडाळे परिसरात ठिकठिकाणी जाऊन ६ हजार ३००  झाडे लावून भव्य वृक्षारोपण करण्यात आले. ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आठवडाभर विविध सामाजिक उपक्रम सुरु राहणार आहेत. अनेक कारणांनी पर्यावरणाचा ऱ्हास होत असून तो थांबविण्यासाठी वृक्ष जतन करणे काळाची गरज आहे. सर्वांनी वृक्ष जतन करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनिर्वाचित कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके यांनी केले. याप्रसंगी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन वृक्षलागवड केली. गोरख बोडके यांनी राबवलेल्या स्तुत्य उपक्रमाचे तालुक्यात कौतुक करण्यात येत आहे. विविडू सामाजिक उपक्रमांनी नागरिकांकडून उपमुख्यमंत्री ना.  अजितदादा पवार यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या.

Similar Posts

error: Content is protected !!