

इगतपुरीनामा न्यूज – नांदूरवैद्य विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदाची आणि व्हॉइस चेअरमनपदाची निवडणूक जेष्ठ नागरिक पंढरीनाथ लक्ष्मण मुसळे, सुखदेव गोविंद दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडली. चेअरमनपदी सुखदेव बापू काजळे तर व्हॉइस चेअरमनपदी ज्ञानेश्वर खंडू कर्पे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी शशांक पगारे, बाळासाहेब काळे, सचिव प्रमोद कहांडोळ यांनी निवडीचे कामकाज पाहिले. निवडीच्या बैठकीवेळी नवनिर्वाचित संचालक लक्ष्मण बाबुराव मुसळे, मोहन बहिरु करंजकर, उत्तम किसन दराडे, काशिनाथ गयाजी तांबे, नामदेव दत्तू राजभोज, पुंजाबाई तानाजी मुसळे, शकुंतला रामदास दवते, प्रवीण आवारी, निवृत्ती दगडू मुसळे आदी हजर होते. माजी ग्रामपंचायत सदस्य केशव काजळे, कैलास कर्पे, विजय कर्पे, सोपान कर्पे, विठोबा दिवटे, आकाश दिवटे, रामेश्वर काजळे, रमेश दवते, सुरेश काजळे, ग्रामपंचायत सदस्य नितीन काजळे, रवी काजळे, मनोहर काजळे, संदीप काजळे, योगेश काजळे, अरुण काजळे, अंकुश काजळे, अशोक काजळे, विक्रम कर्पे आदींसह ग्रामस्थांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.