इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील देवळे खैरगाव रस्त्याची वाट लागली असून ह्या रस्त्यावर छोट्या मोठया अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. वाहनधारक मेटाकुटीस आले असून खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे. म्हणून तात्काळ हा रस्ता दुरुस्त करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वराज्य संघटनेचे तालुका संघटक कृष्णा गभाले यांनी दिला आहे. दोन तीन वर्षांपासून हा रस्ता मंजूर असल्याचे सांगण्यात येत असले तरी रस्त्याबाबत लोकप्रतिनिधी मात्र गुळणी धरून बसले आहेत. प्रशासनाचेही दुर्लक्ष असून सर्वसामान्य जनतेला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. हा रस्ता तातडीने दुरुस्ती करा अशी मागणी स्वराज्य संघटनेने केली आहे.
जिल्हाध्यक्ष डॉ. रुपेश नाठे, उपजिल्हाध्यक्ष डॉ. महेंद्र शिरसाठ, शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष नारायण जाधव, तालुकाध्यक्ष नारायणराजे भोसले, उपतालुकाध्यक्ष सखाराम गव्हाणे, युवा तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष ऋतिक जाधव, तालुका संघटक दीपक खातळे, शिवाजी बाबा गायकर, शिवाजी काजळे यांच्या मार्गदर्शनाखाली आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गटप्रमुख कैलास गव्हाणे, सचिन गभाले, विद्यार्थी सेना सरचिटणीस ईश्वर गायकर, कामगार सेना चिटणीस गौरव गभाले, स्वराज्य शाखाप्रमुख महेश जाधव, योगेश सुरूडे, श्रीराम गभाले, खजिनदार किरण गायकवाड, शाखा उपप्रमुख गोरख मदगे, प्रशांत गभाले, उमेश सुरुडे, हरिश्चंद्र गभाले, वैभव शिरसाठ, प्रशांत सुरुडे, गणपत शिरसाठ, शुभम गभाले, सौरभ गभाले, उत्तम मदगे, जालिंदर सुरूडे, शुभम सुरुडे, योगेश गभाले, विशाल काळे, अरुण जुंद्रे, वासुदेव मोडक आदी कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत.