ओम तपोनिधी प. पू. संत सदगुरू श्री स्वामी अक्षय महाराज आश्रमात गुरूपोर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील गरुडेश्वर येथील ओम तपोनिधी प. पू. संत सदगुरू श्री स्वामी अक्षय महाराज आश्रमात रविवारी २ तारखेपासून गुरूपोर्णिमेनिमित्त दोन दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शंभुवाणी ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. रविवारी २ तारखेला सायंकाळी गुरुदीक्षा, सोमवारी 3 तारखेला पहाटे तीन ते सात वाजेपर्यंत महाजपानुष्ठान त्यानंतर अनुयायी पूजन व देवदर्शन, सकाळी ९ ते १२ पाद्यपूजा, सद्गुरू दर्शन, आशीर्वचन प्रवचन यानंतर महामंगल आरती व महाप्रसाद अशी कार्यक्रमाची रूपरेषा असल्याचे शंभुवाणी ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.

Similar Posts

error: Content is protected !!