कृषी संजीवनी सप्ताहाद्वारे गावागावांमध्ये उपयुक्त विषयांवर शेतकऱ्यांचे प्रबोधन : कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यकांच्या प्रयत्नांना उदंड प्रतिसाद

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील विविध कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यकांकडून कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांना उपयुक्त विषयांवर मार्गदर्शन केले जात आहे. अनेक गावांत प्रात्याक्षिके करून शेतकऱ्यांचे लक्ष वेधले जात आहे. त्यानुसार सांजेगाव, नांदडगाव, वाडीवऱ्हे, पाडळी देशमुख, बेलगाव कुऱ्हे, वाघेरे, बळवंतनगर, कावनई, शिरसाठे, मोडाळे, मुरंबी, मालुंजे, मोगरे, सोमज, कऱ्होळे, शेवगेडांग आदी गावांमध्ये विविध कार्यक्रम राबवण्यात आले. मंडळ कृषी अधिकारी संतोष सातदिवे, कृषी पर्यवेक्षक आबासाहेब आटोळे, किरण सोनवणे, कृषी सहाय्यक शिवचरण कोकाटे, पुंडलिक भोये, संगिता जाधव, रुपाली बिडवे, मोनिका जाधव, अनुपमा पाटील, रेणुका पाटील, विद्या फुसे यांनी शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यामध्ये कृषी पीक लागवड तंत्रज्ञान, पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व, कृषी महिला शेतकरी सन्मानदिन, महिला सक्षमीकरण व सशक्तीकरण, जमीन सुपीकता व्यवस्थापन आरोग्य पत्रिका जागृती, कृषी माल प्रक्रिया तंत्रज्ञान या विषयांचा समावेश आहे. विविध ठिकाणी झालेले सर्व जनजागरण कार्यक्रम उत्साहात पार पडले. ह्या सर्व कार्यक्रमाला शेतकरी महिला व बांधव यांचा भरभरून प्रतिसाद लाभला.

Similar Posts

error: Content is protected !!