प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती १ जुलैला कृषिदिन साजरा होतो. यावेळी राज्यभर कृषी संजीवनी सप्ताह साजरा केला जातो. त्यानुसार आज मुकणे येथे कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत कृषी महिला शेतकरी सन्मानदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती सोमनाथ जोशी, बाजार समितीचे माजी संचालक विष्णु पाटील राव, उद्योजिका मथुरा जाधव, प्रगतशील शेतकरी यशोदाबाई भोर, सरपंच हिरामण राव, उपसरपंच भास्कर राव, मंडळ कृषी अधिकारी संतोष सातदिवे, कृषी पर्यवेक्षक आबासाहेब आटोळे, किरण सोनवणे, पोलीस पाटील शिवाजी आवारी आदी उपस्थित होते. वाघेरे येथील प्रगतशील शेतकरी लक्ष्मण भोर यांनी एसआरटी पद्धतीने भात लागवडीविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
मंडळ कृषी अधिकारी संतोष सातदिवे यांनी शेती बरोबरच पूरक व्यवसाय करून महिला सक्षमीकरण होणे गरजेचे आहे यावर विचार मांडले. कृषी पर्यवेक्षक आबासाहेब आटोळे यांनी विविध योजनांविषयी माहिती दिली. कृषी सहाय्यक शिवचरण कोकाटे यांनी SRT पद्धत कशी फायदेशीर आहे हे उदाहरणासह पटवून दिले. महिला सक्षमीकरणाबद्धल मथुरा जाधव यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी कृषी सहाय्यक पुंडलिक भोये, संगिता जाधव, रुपाली बडवे, मोनिका जाधव, अनुपमा पाटील, रेणुका पाटील, विद्या फुसे, ग्रामपंचायत सदस्य मीरा बोराडे, लक्ष्मण भोर, विश्वास वारुंगसे, प्रगतीशील शेतकरी रामदास राव, चंद्रभान बोराडे, रतन उबाळे, तुकाराम वेल्हाळ, रोहिदास राव, मोहन बोराडे, शैलेश राव, समाधान राव, लहानु साबळे, हरिश्चंद्र राव, भिमा शिरसाट, सुदाम गुळवे, पुंजीराम शिंदे, गणपत शिंदे, ग्रामसेवक उमेश खैरनार, मीना राव, मनीषा राव, गया राव आदींसह शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.