‘नाशिप्र’ च्या इगतपुरी महाविद्यालयात ‘विद्यार्थी विकास मंडळ’ उपक्रमांतर्गत विविध व्याख्याने संपन्न

इगतपुरीनामा न्यूज : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत इगतपुरी येथील ‘नाशिप्र’ संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘इतर उपक्रम योजना’ या  उपक्रमांतर्गत एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत मनोहर घोडे यांनी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धा परीक्षांचे महत्त्व, स्पर्धा परीक्षांचे शिखर गाठण्यासाठी एमपीएससी/यूपीएससी, तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार परीक्षांची उदाहरणे देऊन निश्चित यश गाठण्यासाठी सखोल मार्गदर्शन केले. दुसऱ्या व्याख्यानात डॉ. लियाकत अत्तार यांनी ‘एड्स जनजागृती ‘ या विषयावर सुरक्षिततेसाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात याबद्धल विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. प्राचार्या प्रा. प्रतिभा हिरे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयावर सखोल मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. बी. एच. घुटे  यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासाबरोबर आरोग्य जपून जीवनात सकारात्मक विचारप्रणाली असावी असे मत मांडले. विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. एस. एस. सांगळे यांनी प्रास्ताविक तर  सूत्रसंचालन प्रा. माधुरी झाडे यांनी केले.

Similar Posts

error: Content is protected !!