

इगतपुरीनामा न्यूज – वायु प्रदूषण कमी करण्यासाठी मोफत निर्धुर चूल उपयोगी असून यामुळेच गोरगरीब कुटुंबातील महिलांना मोफत निर्धुर चूली वाटप केल्या आहे. गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे ग्रामीण भागासह खेड्यातील अनेक महिला पुन्हा चुलीकडे वळण्याचे प्रमाण वाढले आहे. ज्या कुटुंब कुटुंबाकडे गॅस नाही ते कुटुंब अजूनही चुलीवरच स्वयंपाक बनवत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण निर्माण होत असून चुलीवर जेवण बनवताना निर्माण होणारा धूर श्वसनाद्वारे महिलांच्या फुफ्फुसात जाऊन त्यांना दमा खोकला आदी आजारांना सामोरे जावे लागत आहे. हे टाळण्यासाठी मोफत निर्धुर चुल वाटप करण्यात आल्या असे प्रतिपादन रोटरी क्लबचे अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथे परीगा वेल्फेअर फाऊंडेशन आणि रोटरी क्लब नाईन हिल्स यांच्या संयुक्त विद्यमाने २०० महिलांना निर्धुर चुली मोफत वाटप करण्यात आल्या. यावेळी गोरख बोडके यांनी महिलांशी संवाद साधला. ह्या चूल योजनेचा परिसरातील महिलांना मोफत लाभ देऊन यावेळी चुली वाटप करण्यात आल्या. आगामी काही दिवसात ८०० निर्धुर चुली मोफत वाटप करण्यात येणार आहे. वाटप कार्यक्रमाप्रसंगी फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती पवार मॅडम, रोटरी क्लबचे अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके, सामाजिक कार्यकर्ते राहुल बोंबले आणि लाभार्थी महिला मोठ्या संख्येने हजर होत्या.

