इगतपुरीनामा न्यूज – घोटी सिन्नर मार्गावरील गंभीरवाडी जवळ गोवंश रक्षकांनी एका स्विफ्ट कार मधील दोघांना मारहाण केल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा ठपका ठेवत कर्तव्यात कसूर केली म्हणुन घोटी पोलीस ठाण्यातील तीन पोलीसांना निलंबित करण्यात आले आहे. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रध्दा गंधास यांची नाशिकच्या पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील सिन्नर घोटी मार्गावर असलेल्या गंभीरवाडी येथे गोमांस तस्करीच्या संशयावरून १५ ते २० गोवंश रक्षकांनी मिळुन मारहाण केल्याने एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली होती. इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या घोटी सिन्नर मार्गावरील गंभीरवाडी जवळ शनिवारी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास सिन्नरहुन मुंबईकडे गोमांस घेऊन जाणारी स्विफ्ट कार अडवुन कारमधील दोन जणांना दहा ते पंधरा जणांच्या जमावाकडून लोखडी रॉड व दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली होती. या गंभीर प्रकरणाचा ठपका ठेवत कर्तव्यात कसूर केली म्हणुन घोटी पोलीस ठाण्यातील पोलीस बिपीन जगताप, भास्कर शेळके, किसन कचरे यांना निलंबित करण्यात आले आहे. यासह सहाय्य्क पोलीस निरीक्षक श्रद्धा गंधास यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group