इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरीच्या बाजारात जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहणाऱ्या दुर्गा वाळू झूगरे रा. वाकडपाडा ह्या आदिवासी महिलेला मुंबई आग्रा महामार्गावरच अकस्मात प्रसूती कळा सुरु झाल्या. जवळच उभे असलेले कंट्रोल रूम ऑफिसर समीर चौधरी, गुलाब गवळी, चालक नारायण वळकंदे यांनी ह्या भगिनीची अवस्था पाहून तिला मदत करण्याचा निर्णय घेतला. मात्र तत्पूर्वीच ह्या महिलेने महामार्गावरच एका गोंडस बाळाला जन्म दिला. रूट पेट्रोलिंग टीमच्या कर्मचाऱ्यांनी यानंतर महिलेसह तिच्या बाळाला इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल केले. आई आणि बाळ दोन्ही सुरक्षित असल्याचे समजते. मुंबई आग्रा महामार्गावरील पिंप्री फाटा फाट्यावरून ही आदिवासी महिला इगतपुरी शहरात बाजार करण्यासाठी चालली होती. पिंप्री फाट्यावर रिक्षाची वाट बघत असताना तिला अचानक प्रसूतीकळा सुरू झाल्या. तिला मदत करण्याच्या आधीच तिने तिथेच एका गोंडस बाळाला जन्म दिला.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group