इगतपुरीनामा न्यूज – अलनियोमुळे पाऊस उशिराने असल्याने सध्याच्या अनियमित पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत झिरपला पाहिजे यासाठी मृद व जलसंधारण विभाग कार्यरत आहे. संबंधित विभाग आणि कंत्राटदाराने जलसंधारणाची सर्व कामे गुणवत्तापुर्वक, वेळेत आणि पावसाळ्यापुर्वी पुर्ण करावीत अशा सूचना सोनोशीचे भूमिपुत्र तथा प्रादेशिक जलसंधारण अधिकारी इंजि. हरिभाऊ गिते यांनी दिल्या आहेत. सोनोशी येथील पाझर तलाव दुरुस्तीच्या कामांचा प्रारंभ आणि भुमिपुजन प्रादेशिक जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना मोलाचे मार्गदर्शन करून संबंधित अधिकाऱ्यांना कामे दर्जेदार करण्याच्या सुचना दिल्या. संगमनेर तालुक्यातील जलयुक्त शिवार टप्पा २.० च्या मधील निवड झालेल्या गावांचा आराखडा तात्काळ करावा, अटल भुजल योजना पाझर तलाव दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करुन निधीची मागणी करावी आदी सुचना उपविभागीय जलसंधारण उपविभागाला यावेळी देण्यात आल्या.
सोनोशीचे सरपंच राजेंद्र गिते यांनी दुरुस्ती कामाला ग्रामस्थ संपुर्ण सहकार्य करतील असे सांगत गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजनेतून गाव बंधाऱ्यातील गाळ काढण्याची विनंती केली. त्यानुसार प्रादेशिक जलसंधारण अघिकारी हरिभाऊ गिते यांनी उपविभागाला हे काम हाती घेण्याच्या सुचना दिल्या. यावेळी उपसरपंच राजेंद्र सानप, सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब गिते, गोरक्ष सानप, आरडीओ संशोधक लहानु गिते, वाडिया महाविद्यालयाचे प्रा. मनोहर सानप, चंद्रकांत सानप, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल सानप, अमोल गिते, सुदामराव सानप, बाळासाहेब गिते, माधव गिते, सखाराम सानप, सोपान गिते, गबाजी गिते, सोमनाथ गिते, कचरू गिते, रामदास सानप, मारुती सानप, बबन गिते. गोपीनाथ सांगळे, संपत गाडेकर यांच्यासह संगमनेर मृद व जलसंधारण उपविभागाचे उपअभियंता कपिल बिडगर, कनिष्ठ अभियंता मंडलिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.