
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला महामार्गावरील नामांकित १९७० ओल्ड प्रभू ढाब्याच्या दुसऱ्या शाखेचा गुरुवारी २९ ऑगस्टला भव्य शुभारंभ होत आहे. महामार्गावर मुंबईहून नाशिकच्या दिशेने जुन्या हॉटेल समोर, गोंदे येथे हा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ढाब्याचे संचालक चाटे परिवाराने केले आहे. या नवीन हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी एसी, नॉन एसी लॉजिंग बोर्डिंग सुविधा उपलब्ध असणार आहे. गेल्या ५३ वर्षांपासून सुरू असलेल्या पहिल्या शाखेत अस्सल मराठमोळ्या जेवणाचा आस्वाद देण्यासाठी हॉटेलचे जेष्ठ संचालक बंडूशेठ चाटे यांनी ग्राहकांनी चांगली सेवा दिली आहे. १९७० पासून सुरु असलेल्या पहिल्या शाखेबरोबरच आता दुसरी शाखाही ग्राहकांच्या सेवेत तत्पर झाल्याने ग्राहकांनी शुभेच्छा दिल्या. पहिल्या शाखेत हॉटेलचे संचालक विलास भाऊ चाटे, अविनाश भाऊ चाटे, चि. मोहित विलास चाटे हे नेहमीच ग्राहकांना उत्तम सेवा देत असतात. चोखंदळ ग्राहक या ढाब्याचे कौतुक करून तृप्त होऊन जात असतात. ग्राहकांच्या मनात अबाधित स्थान निर्माण करणाऱ्या १९७० ओल्ड प्रभू ढाब्याला उत्कृष्ट हॉटेल पुरस्कार मिळाला आहे. नूतन १९७० ओल्ड प्रभू ढाब्याच्या दुसऱ्या शाखेतही ग्राहकांना समाधानी करण्याचे लक्ष्य ठेवुब शुभारंभ केला आहे.