
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील घोटी बुद्रुक येथे फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट टाकणे एकाच्या अंगलट आले आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट टाकल्याबद्दल ह्या तरुणावर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोएब मणियार रा. सुधानगर घोटी असे या तरुणाचे नाव आहे. घोटी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल निलेश विलास साळवे यांच्या फिर्यादी वरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्या घटनेयावरून काही काळ घोटी येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घोटी पोलीस ठाण्याबाहेर यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र घोटी आणि इगतपुरी पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार न होऊ देता परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. घोटी शहरातून रूट मार्च काढत नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या आपत्तीजनक पोस्ट ठेऊ नये व अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.