रक्षाबंधनाच्या दिवशीच १८ वर्षीय तरुणीची आत्महत्या : मोबाईलवर गाणे ऐकता ऐकता संपवले जीवन

दुर्दैवी योगिता एका कार्यक्रमाप्रसंगी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२

इगतपुरी तालुक्यातील तळेगाव येथील एका १८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची आज घटना घडली आहे. स्वतःच्या घरात गळफास लावून तिने जीवन संपवले. मोबाईलवर स्पीकर ओपन करून गाणे ऐकता ऐकता केलेल्या ह्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. इगतपुरी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, तळेगाव ता. इगतपुरी येथील मारुती भोईर हे पत्नीसह मोडाळे येथे आज सकाळी गेले होते. घरी त्यांची मुलगी योगिता मारुती भोईर वय १८ ही एकटीच होती. सायंकाळी पावणेआठच्या सुमारास नातेवाईकांनी योगिताला जेवणासाठी हाका मारल्या. मात्र तिचे उत्तर येत नसल्याने त्यांनी घरात जाऊन बघितल्यावर योगिताने गळफास लावल्याचे आढळून आले. याबाबत इगतपुरी पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी तातडीने धाव घेऊन कार्यवाही केली.

आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकले नाही. सायंकाळी ६ च्या सुमारास योगिताने मोबाईलवर गाणे लावून जीवन संपवले असल्याचे समजते. योगिताला २ मोठ्या बहिणी असून ही शेवटची होती. एकच भाऊ असून ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी ही घटना घडल्याने तळेगाव भागात हळहळ व्यक्त होत आहे. इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन तपास कार्य सुरू केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!