इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
इगतपुरी तालुक्यातील शेणवड खुर्दच्या लोहकरे वस्तीपासून मुंबई आग्रा महामार्गावरील माधुरी हॉटेल पर्यंत दोन्ही रेल्वेमार्गावरून पूल निर्मित करावा अशी मागणी घोटी बाजार समितीचे संचालक तुकाराम वारघडे यांनी केली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे नाशिक दौऱ्यावर असताना श्री. वारघडे यांनी त्यांना भेटून मागणीचे निवेदन दिले. ह्या भागातील पाडळी देशमुख आणि अनेक गावांतील हजारो नागरिकांना ह्या पुलाचा फायदा होईल. या पुलामुळे रेल्वेच्या अडचणींमुळे ह्या भागातील खुंटलेला विकास अधिक गतीने पूर्ववत होईल अशी चर्चा यावेळी झाली. ना. रावसाहेब दानवे यांनी ह्या मागणी संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. पाडळी देशमुख, शेणवड खुर्द, गरूडेश्वर, नांदगांव बुद्रुक आणि 12 आदिवासी वाड्या, जानोरी व मुंढेगाव, साकुर आदी भागातील नागरीकाना पुलाचा फायदा होऊ शकेल अशीही चर्चा यावेळी झाली.