इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील विविध भागातील राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक वगैरे व्हॉट्सॲपच्या हजारो ग्रुपवर इगतपुरी, घोटी, वाडीवऱ्हे ह्या तिन्ही पोलीस ठाण्यांकडून करडी नजर ठेवण्यात येत आहे. यासह फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटरवर चांगलेच लक्ष ठेवले जात आहे. इगतपुरी तालुका शांत असणारा लोकप्रिय तालुका असून समाजविघातक पोस्टमुळे शांतता आणि कायदेभंग होऊ नये म्हणून पोलीस ॲक्टिव्ह मोडवर आलेले आहेत. जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणारे वातावरण सोशल मीडियावर लगेचच पसरते. परिणामी कायदा सुव्यवस्था धोक्यात येण्याची दाट शक्यता असते. यासह अफवा पसरल्याने सार्वजनिक शांतता बिघडवून टाकली जाते. ही नाजूक परिस्थिती असल्याने इगतपुरी तालुक्यात दक्षता घेतली जाते आहे. गुरुवारी रात्री वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर टाकल्याने एका तरुणावर घोटीत गुन्हा दाखल झालेला आहे. सोशल मीडियावर कोणीही वादग्रस्त पोस्ट टाकल्याचे दिसून आल्यास पोलिसांकडून तात्काळ कठोर कारवाई आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यासह संबंधित व्यक्तींचा मोबाईल जप्त करण्यात येणार आहे. पोलिसांकडून सोशल मीडियावर विशेष लक्ष घालून विघातक व्यक्तींचा बंदोबस्त होत असल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे. वादग्रस्त पोस्ट आढळल्यास संबंधित ॲडमिनलाही तुरुंगाची हवा खावी लागणार असल्याने ॲडमिनकडून ग्रुपची सेटिंग Only Admin केली जात असल्याचेही दिसून आले आहे. इगतपुरी तालुक्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट आढळल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावे. पोलीस आपल्या सगळ्यांच्या हितासाठी काम करीत आहेत. म्हणून पोलिसांना सहकार्य करून शांतता अबाधित ठेवावी असे आवाहन इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी केले आहे.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group