गतिरोधकामुळे मुरंबी वाडीवऱ्हे रस्त्यावर मोटारसायकलचा अपघात : पतिपत्नी गंभीर जखमी ; प्रतिक गोवर्धने यांनी केले मदतकार्य

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१

मुरंबी वाडीवऱ्हे रस्त्यावर मोठ्या संख्येने असणाऱ्या गतिरोधकांमुळे रोजच छोटे अपघात होत आहेत. आज दुपारी मुरंबी येथील भैरवनाथ मंदिराजवळ मोटारसायकलचा अपघात झाला. यामध्ये पतिपत्नी जखमी झाले आहेत. सामाजिक कार्यकर्ते प्रतिक गोवर्धने यांनी तातडीने मदतकार्य केले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड हे समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी पप्पू बळीराम वारघडे वय 33, पाखराबाई पप्पू वारघडे वय 30 रा. माळेकरवाडी ह्या जखमींना वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. दरम्यान अनधिकृतपणे ह्या रस्त्यावर अनेक गतिरोधक टाकण्यात आले आहेत. ह्यामुळे मोटारसायकली अपघातग्रस्त होतात. आजचा अपघातही गतिरोधकावरून मोटासायकलस्वार निसटल्याने झाल्याचे सांगण्यात आले. संबंधित यंत्रणेने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रतिक गोवर्धने यांनी केली आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!