कसारा घाटात चार वाहनांच्या अपघातात २ ठार ; अपघातग्रस्त वाहनांतील मृत कोंबड्यांचा रस्त्यावर खच

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावर नवीन कसारा घाटात आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. ह्या अपघातात २ जण ठार तर १ जण गंभीर जखमी झाला असून जखमीला इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे कारण अस्पष्ट आहे. आयशर, छोटा हत्ती आणि दोन पिक अप यांच्यात हा विचित्र अपघात झाला. दोन्ही पिक गाड्यांमधील कोंबड्या मृत्युमुखी पडुन रस्त्यावर पडल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर कोंबड्याच कोंबड्या दिसून येत आहेत. कसारा पोलीस आणि महामार्ग पोलीस, रूट पेट्रोलिंग टीम घटनास्थळी दाखल होऊन
अपघातग्रस्त वाहने टोल क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आले. इस्तकार इजहर खान वय २५, मुस्तफा खान वय ३५ अशी मयतांची मयत नावे असून वजीर खान हे जखमी व्यक्तीचे नाव आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र कैलास गतीर यांनी अपघातस्थळी दाखल होऊन जखमीला रुग्णालयात दाखल केले.

Similar Posts

error: Content is protected !!