इगतपुरीनामा न्यूज – राजकारणाचा घोडेबाजार, बंडखोऱ्या सामान्य जनता पाहत असून लोक अधिकच संभ्रमात आहे. सदेवजन राजकारणाकडे गलिच्छ नजरेने बघत आहे. एकमेव पारदर्शक स्वच्छ व इतिहासाची जोड असलेला जनतेचा पारदर्शक पक्ष सध्यातरी स्वराज्य हाच आहे. त्यामुळे जनता पुन्हा स्वराज्य उदयास आणणार आहे. तरुण आता संघटित झाला असून जाणकार लोकांसह इतर संघटनांनी एकत्रित येऊन महाराष्ट्र वाचविण्याची गरज आहे. यासाठी “स्वराज्य” हाच सक्षम पर्याय असल्याने सर्वांनी कामाला लागावे असा विश्वास स्वराज्यचे इगतपुरी तालुकाध्यक्ष नारायण राजेभोसले, युवा तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे यांनी व्यक्त केला. राजकारणामुळे लोकांच्या समस्यांकडे कोणाचे लक्ष नाही. जनता बुचकळ्यात सापडली असून कुणाचा झेंडा घेऊ हाती असा प्रश्न पडला आहे. यामुळे स्वराज्यकडे जनता आशेने बघत आहे. अनेक ठिकाणी युवक स्वराज्यमध्ये मोठ्या प्रमाणात पदग्रहण करीत आहेत. छत्रपतीच्या विचारावर चालणाऱ्या ह्या पक्षाचे प्रमुख छत्रपतींचे तेरावे वंशज युवराज छत्रपती संभाजी राजे, पक्षाचे संपर्कप्रमुख करण गायकर यांचे खंबीर नेतृत्व स्वराज्यकडे आकर्षण वाढवत आहे.
संभाजी राजे यांनी दिलेल्या नियोजनातून स्वराज्य अनेक प्रश्न सोडवत आहे. अठरा पगड जाती बारा बलुतेदारांचा “स्वराज्य” महाराष्ट्राच्या राजकारणातील सक्षम पर्याय होऊ पहात आहे. शेतकरी, कामगार, शिक्षण, आरोग्य आणि सहकार या पंचसूत्रीवर “स्वराज्य” काम करीत आहे. इगतपुरी तालुक्यातील अनेक शाखा उदघाटने झाली असून पन्नास शाखेची जोरदार तयारी सुरू आहे. स्वराज्यकडे तालुक्यातील जनता खुप आशेने बघत आहे. आगामी काळात लोकसभा, विधानसभा यांचे तोरण याच मतदारसंघातून बांधले जाईल याचा ठाम विश्वास वाटतो. आगामी निवडणुकांमध्ये स्वराज्यकडुन सुशिक्षित युवकांना संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे परंपरागत, घराणेशाहीचे राजकारण मोडीत येईल असेही स्वराज्य तालुकाध्यक्ष नारायण राजे भोसले, युवा तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे यांनी सांगितले.