
इगतपुरीनामा न्यूज – जिल्हा परिषद व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आर्थिक वाहिनी असलेली नाशिक जिल्हा कर्मचारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सहकार पॅनलचे सर्वच उमेदवार होतकरू व अभ्यासू आहेत. बँकेच्या उज्वल भवितव्यासाठी सहकार पॅनलच्या सर्वच उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉ. कपिल आहेर यांनी केले. नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सहकार पॅनलच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. त्यावेळी डॉ. आहेर अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. या कार्यक्रमासाठी कामगार नेते करुणासागर पगारे, दिलीप थेटे, महेश आव्हाड, रवींद्र थेटे, उत्तमराव गांगुर्डे, सदाशिव बारगळ, दिलीप सलादे, दादाभाऊ निकम, विलास शिंदे, शरद विसपुते, बबनराव भोसले, ज्ञानेश्वर कासार व्यासपीठावर उपस्थित होते.
गटबाजी व एकाधिकार शाहीला कंटाळून बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष मंदाकिनी पवार, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब ठाकरे यांच्यासह संचालक दिलीप थेटे, दिलीप सलादे, सुनील गीते, संदीप पाटील, महेश मुळे, धनश्री कापडणीस, सुभाष पगारे, मंगेश पवार, अजित आव्हाड या ११ संचालकांनी समता पॅनलला सोडचिठ्ठी दिली. सहकार पॅनलच्या विजयी करून संबंधितांना निवडणुकीत धडा शिकवण्याचा चंग बांधला आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी लिपिकवर्गीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष व सहकार पॅनलचे नेते प्रमोद निरगुडे, रवींद्र आंधळे, किरण निकम, सचिन विंचुरकर, विक्रम पिंगळे, नंदकिशोर सोनवणे, इंजि. जितेंद्र पाटील, विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.
यावेळी आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय सोपे, हिवताप कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत आहिरराव, मराठा आरोग्य कक्षाचे कार्याध्यक्ष अनिल भामरे, अभियंता संघटनेचे जिल्हाध्यक्ष इंजि. बाविस्कर, जितेंद्र पाटील, प्रविण पाटिल, डी. एम. गोवर्धने, पांडुरंग कांडेकर, बाळासाहेब चौधरी, एकनाथ वाणी, नामदेव वाणी, पतसंस्थेचे संचालक किशोर अहिरे, न्यायालयीन कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष दादाभाऊ निकम, दीपक मोरवाळ, महसूल कर्मचारी संघटनेचे ज्ञानेश्वर कासार, राजेंद्र अहिरे, सुभाष शेजोळे, बबन दरगुडे, प्रकाश पाटोदकर, विवेक शिंदे, रवीकिरण गायकवाड, उमेश देशमानकर, सुनील गवळी, भाऊसाहेब शिंदे, डि. पी. शिंदे, शिवाजी राजे मेधने, देविदास शिंदे, संजय देवरे, बाळकृष्ण गायकवाड, माजी संचालक सुभाष पगारे, दिलीप सलादे, अरुण पळसकर बबनराव भोसले, दिलीप सानप, अरुण तांबे, दिलीप ससाणे, राहुल आहेर, संतोष लवंगे, दत्तू वाघ, राजेंद्र पाटील, मिलिंद जगताप, नितीन सावंत, सुरेश शिरसाट, मोहन गांगुर्डे, रमेश बोडके, अनिल वाघ, बुधाजी बहिरम, खंडू कोकाटे गोकुळ कुवर, निरंजन सोनवणे, हरिश्चंद्र रणमाळे यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक महेश आव्हाड, सूत्रसंचालन सुभाष कंकरेज, निलेश देशमुख यांनी तर आभार मंदाकिनी पवार यांनी मानले.
