रस्ते सुरक्षिततेसाठी महिंद्रा कंपनीचा पुढाकार ; रस्ते सुरक्षिततेसाठी एक पाऊल पुढे : पिंप्रीफाटा ते भावली धरण रस्त्याचा कायापालट करणार

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३

रस्ते सुरक्षिततेसाठी शासन स्तरावर विविध योजना राबवण्यात येतात. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येतात. अपघातांना आळा घालण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे हाच मुख्य उद्देश असून याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या सीएसआर प्रकल्पांतर्गत व युनायटेड वे मुंबई या संस्थेच्या माध्यमातून संयुक्तपणे रस्त्याच्या सुरक्षिततेसाठी कार्य करणार असल्याचे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे व्यवस्थापक टाॅम थाॅमस यांनी सांगितले. आज अपघातांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून या वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी व युनायटेड वे मुंबई या संस्थेच्या माध्यमातून संयुक्तपणे रस्त्याच्या असलेल्या अडचणी, रस्त्यांचा वीजेचे प्रश्न, इतर सर्व बाबींचा विचार करून रस्ते सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार आहे. वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी महिंद्रा अँड महिंद्राचे व्यवस्थापक श्री. थाॅमस यांनी सांगितले.

यात प्रामुख्याने इगतपुरी तालुक्यातील पिंप्री ते भावली हा रस्ता नेहमीच पर्यटकांनी गजबजलेला असतो. हा रस्ता  सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येत असल्यामुळे त्यांचेही या रस्ता सुरक्षा अभियानात सहकार्य असणार असल्याचे यावेळी युनायटेडवे मुंबई संस्थेचे अजय गोवाले यांनी सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी महिंद्रा अँड महिंद्राचे व्यवस्थापक टाॅम थाॅमस, इगतपुरीचे नगराध्यक्ष संजय इंदुलकर, उपनगराध्यक्ष नईम खान, माजी उपसभापती भगवान आडोळे, भावलीचे सरपंच दौलत भगत, अग्निशामक दलाचे हरिष चौबे, जिजाबाई आगीवले, अमोल पाटील, सतीश ढोकणे, जयंत इंगळे, युनायटेडवे मुंबई संस्थेचे अजय गोवाले, रविंद्र अरवेल, विकास इंटरप्रायझेसचे श्री. शिंदे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

अपघातांच्या वाढत्या प्रमाणाला आळा बसणे, प्रवाशांना प्रवासादरम्यान प्रवास सुरक्षित करता यावा हाच एकमेव उद्देश मनात धरून आम्ही राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियानाअंतर्गत रस्ता सुरक्षिततेसाठी पाऊल उचलले आहे. निश्चितच आमच्या कार्याला यश मिळेल व प्रवासादरम्यान निष्पाप जीवांना धोका होण्यापासून दिलासा मिळेल.
- टाॅम थाॅमस, व्यवस्थापक, महिंद्रा इगतपुरी

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!