भरधाव वाहनाच्या धडकेमुळे ट्रॅक्टर अपघातात दहेगाव येथील १ ठार, १ गंभीर जखमी : पाडळी फाट्यावर नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेने केले मदतकार्य

इगतपुरीनामा न्यूज – घोटीकडून नासिकच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्टरला भरधाव आयशरने पाठीमागून ठोकल्याने अपघात झाला. मुंबई आग्रा महामार्गाव पाडळी देशमुख फाट्यावर आज पहाटे साडेतीन वाजता ही घटना घडली. धडक बसल्याने ट्रॅक्टर थेट पाडळीजवळ मोरीच्या खाली जाऊन पडला. या अपघातात शरद रामभाऊ रहाडे वय ४० रा. दहेगाव, ता. जि. नाशिक हे जागीच ठार झाले आहेत. निवृत्ती लक्ष्मण रहाडे वय ६० हे गंभीर जखमी झाले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमीला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.

Similar Posts

error: Content is protected !!