सिंहस्थ कुंभमेळ्यात सर्वतीर्थ टाकेदचा समावेश करून विकासात्मक कामे करा : शिवसेना उपजिल्हाप्रमुख मोहन बऱ्हे यांची मागणी

इगतपुरीनामा न्यूज – सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक व त्र्यंबकेश्वरसह इगतपुरी तालुक्यातील ‘सर्वतीर्थ टाकेद’  या ऐतिहासिक व धार्मिक स्थळाचाही सर्वसमावेशक विकास आराखड्यात समावेश करावा. टाकेद क्षेत्रात येणाऱ्या साधू-संतांसाठी ‘साधुनिवास’ आणि भाविकांसाठी ‘भक्तनिवास’ ची भव्य उभारणी करावी. संपूर्ण तीर्थक्षेत्र व तीर्थ परिसर सुशोभीकरण करण्यात यावे. टाकेद क्षेत्रात विविध विकासात्मक कामे हाती घ्यावीत अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख मोहन बऱ्हे यांनी इगतपुरी तालुक्याच्या वतीने केली आहे. शासनाने ह्या ह्या मागण्या पूर्ण केल्यास भाविकांना उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध होऊ शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात आज नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि नेतृत्वाखाली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी श्री. मोहन बऱ्हे यांनी सविस्तर मागण्या मांडल्या. या बैठकीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. इगतपुरी तालुक्याच्या वतीने ‘सर्वतीर्थ टाकेद’ या ऐतिहासिक व धार्मिक स्थळाचा सिंहस्थ कुंभमेळ्यात अधिकृत समावेश करण्यासाठी उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावेळी पाठपुरावा करण्यात येईल असा शब्द शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे, शिवसेना उपनेते विजयअप्पा करंजकर यांनी यावेळी दिला. या बैठकीस उपमहापौर विलास शिंदे, गटनेते अजय बोरस्ते, नगरसेवक व महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, सूर्यकांत लवटे, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, निर्मला गावित, पांडुरंग गांगड, रमेश गावित, संपत काळे, तालुकाप्रमुख देविदास जाधव, रावसाहेब कातोरे, पंडित कातोरे, दिलीप मुसळे, युवासेना प्रमुख विनोद भागडे, माजी सभापती सोमनाथ जोशी, सामाजिक कार्यकर्ते संजय खातळे, संघटक दत्तात्रय गुंजाळ, शहरप्रमुख विनायक पाटील, तानाजी रुमणे, कुंडलिक जमधडे, भास्कर आहेर आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!