इगतपुरीनामा न्यूज – समाज जागृतीच्या हेतूने सुरू झालेल्या गणेशोत्सवाची परंपरा गणेश मंडळांनी ठेवत ठेवावी. नियमांचे तंतोतंत पालन करून उत्सवाला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नसून सामाजिक जबाबदारीने काम करावे असे आवाहन वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी केले. वाडीवऱ्हे येथे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी कार्यक्षेत्रातील गणेश मंडळांना पोलीस निरीक्षक भामरे यांनी मार्गदर्शन केले. गणेश मंडळांनी प्रक्षोभक देखावे उभारू नये, डीजेला आणि वालदेवी धरणावर गणपती विसर्जनाला बंदी, दारणा धरणावर मोठे गणपती बुडवायला बंदी केल्याचा बैठकीत निर्णयघेण्यात आला. याप्रसंगी श्री. भामरे यांनी गणेश मंडळाच्या अडचणी समजून घेतल्या. सांस्कृतिक सामाजिक भावना दुखावल्या जातील अशा बॅनरबाजी करू नये, सोशल मीडियावर कुणाच्या भावना दुखावणाऱ्या पोस्ट करू नका, गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा करा असे श्री भामरे म्हणाले. पोलीस नाईक प्रवीण काकड, दारणा धरणाचे संदेशक संदीप मते, मुकणे धरणाचे दीपक पाटील, गणेश मंडळाचे अध्यक्ष, पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group