श्री दत्त सेवा समितीच्या वतीने टेंभे स्वामी स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन

इगतपुरीनामा न्यूज – श्री दत्तसेवा समितीच्या वतीने  प. पु. वासुदेवानंद सरस्वती टेंभे स्वामी महाराज स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात २ ते ४ सप्टेंबर पर्यंत ही व्याख्यानमाला होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. व्याख्यानमाला मागील नऊ वर्षांपासून आयोजित केली जात असून यंदा आयोजनाचे दहावे वर्ष आहे. २ ते ४ सप्टेंबर दरम्यान दररोज सायंकाळी सहा वाजता हभप विवेक बुवा गोखले ( नृसिंहवाडी ) हे ‘परमहंस परीव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंभे स्वामी महाराज यांचे जीवनचरित्र’ या विषयावर विवेचन करणार आहेत. या तीन दिवसीय व्याख्यानमालेत अनुक्रमे डॉ. माऊंजकर ( नाशिक ), डॉ. शिरीष देव ( ओझर ), गुंतवणूक सल्लागार नितीन मराठे हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. सदर व्याख्यानमालेचे नियोजन श्री दत्त सेवा समिती करत आहे.

Similar Posts

error: Content is protected !!