इगतपुरीनामा न्यूज – जय जवान जय किसान असे सर्वजण उत्स्फूर्तपणे म्हणून वर्षातून. आपण देशभक्ती प्रकट करतो. पण आपली देशभक्ती सोशल मिडियापलीकडे जात नाही. मी व माझे कुटुंब यापलीकडे जायला काही मर्यादा येतात. पण छ्त्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार आचरणात आणून कार्य करणारे घोटीचे यशस्वी उद्योजक हॉटेल शिवभोलेचे संचालक स्वराज्य संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे व पत्नी अश्विनी धोंगडे ह्यांनी शहीद जवान आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मोफत अल्पोपहार देण्याचा संकल्प केला आहे. ह्या उपक्रमाचा शुभारंभ घोटी सिन्नर फाट्यावर वीरनारी वीरमाता बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापकीय अध्यक्षा रेखा खैरनार, जळगाव जिल्हाध्यक्षा कविता साळवे, जयश्री पाटील, संगीता पाटील, जयश्री रेंगे, गंगुबाई भले, शैला पाचरणे, नीलिमा जाधव, दीपाली पाटील यांच्याकडून करण्यात आला. इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी उपक्रमाचे कौतुक केले आहे.
माझ्या देशाचं मी काही देणं लागतो ह्या शुध्द भावनेने महाराष्ट्रातील कुठल्याही कानाकोपऱ्यातून कधीही शहीद कुटुंब किंवा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब आल्यास त्यांच्या खाण्यापिण्याची सोय केली जाईल असे शिवभोलेचे संचालक गोकुळ धोंगडे यांनी जाहीर केले. त्यांच्या मोफत अल्पोपहार देण्याच्या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे. माजी सैनिक विजय कातोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवभोलेचे संचालक गोकुळ धोंगडे यांनी सुरू केलेल्या उपक्रमाचे upsb वीरनारी व वीरपत्नी यांनी कौतुक केले. यावेळी जळगाव, धुळे, नाशिकहून शहीद परिवार हजर होते. यावेळी प्रहार सैनिक कल्याण संघाचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक विजय कातोरे, बाजार समितीचे सचिव जितेंद्र सांगळे, विठोबा दिवटे, इगतपुरीचे ठाणे अंमलदार दत्तू वाजे, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे, दौलत मेमाणे, माजी सैनिक हरीश चौबे, किसन हंबीर, सामाजिक कार्यकर्ते सागर गावंडे, नंदू आंबेकर आदी उपस्थित होते. शहीद कुटुंबासाठी गोकुळ धोंगडे यांनी घेतलेला निर्णय खूपच कौतुकास्पद आहे. जिल्ह्यातील हे एकमेव हॉटेल असेल त्यात शहीद परिवाराला अल्पोपहार मोफत मिळणार आहे. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असे वीरनारी वीरमाता बहुउद्देशीय संस्था अध्यक्षा रेखा खैरनार यांनी सांगितले.