आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडून भरवीर खुर्द चौरेवाडी येथील उपसा सिंचन योजनेचे उदघाटन संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – विकासाचे राजकारण करायला आवडत असल्याने शेतकऱ्यांना सुरळीत पाणीपुरवठा कसा होईल यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतीला पाण्याची कमतरता पडणार नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी सुजलाम सुफलाम होण्यासाठी सोलर योजनाही राबवणार आहे. शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात दोनच ठिकाणी मंजूर झालेल्या उपसा सिंचन योजना पदरात पाडून घ्या. योजनांची अडचण असल्यास संपर्क साधा असे आवाहन सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले. भरवीर खुर्द ( चौरेवाडी)  येथे महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरंगाबाद अंतर्गत ५०० हेक्टर क्षेत्रावर दोन ठिकाणी १२ कोटी निधीच्या श्री बाल भैरवनाथ उपसा सिंचन योजनेचा उदघाटन समारंभ सोहळा पार पडला. याप्रसंगी आमदार माणिकराव कोकाटे बोलत होते. १२ वर्षांपासून अनेक कारणांनी रेंगाळलेली बालभैरवनाथ उपसा सिंचन योजना आमदार माणिकराव कोकाटे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर मंजूर झाल्याने शेतकऱ्यानी व ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.  जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गीते यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम मार्गी लागणार आहे. यावेळी निवृत्त जलसंधारण अधिकारी अविनाश लोखंडे यांनी जलसिंचन योजनेची परिपूर्ण माहिती सांगितली. याप्रसंगी ज्ञानेश्वर भोईर यांनी विजेच्या प्रश्नाबाबत कैफियत मांडली. सरपंच अश्विनी विशाल भोईर यांनी भरवीर खुर्द ते चौरेवाडी रस्त्याचे तसेच भरवीर खुर्द ते समृद्धी बायपास बांडेवाडी पर्यंत रस्ता होण्याबाबत आमदार कोकाटे यांना निवेदन दिले.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, रतन पाटील जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य केरु दादा खतेले, सरपंच अश्विनी भोईर, स्वराज्य संघटना शेतकरी आघाडीचे तालुकाध्यक्ष शिवाजी काजळे, धामणीचे माजी उपसरपंच गौतम भोसले, ज्ञानेश्वर भोईर आदींनी मनोगत व्यक्त केले. समृद्धीमुळे विकसित भाग होऊन विकासाची गंगा पोहचत आहे. याचा फायदा तरुण मित्रांनी घेतला पाहिजे. विकासाचे स्वप्न पडले पाहिजे. आपल्या गावात विकासाची पाऊले चालत आली आहेत. त्याचे  मनापासून स्वागत करून नावलौकिक करा असे आमदार कोकाटे यांनी शेवटी सांगितले. जलसंधारण अधिकारी आर. टी शिंदे, जलसंधारण अधिकारी अविनाश लोखंडे, ऐश्वर्या सिसोदिया, मोहन गोडसे, विशाल गोडसे, वडांगळीचे सरपंच योगेश घोटेकर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष देविदास शिंदे, पोलीस पाटील रमेश टोचे, सामाजिक कार्यकर्ते भूषण डामसे, बापू टोचे, शंकर पुंडे, भाऊसाहेब कोकणे, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष संदीप टोचे, माजी सरपंच दत्तू जुंद्रे, तुळशीराम टोचे, युवा नेते महेश गाढवे, संपतराव टोचे, रामभाऊ सारुक्ते, विलास शिंदे, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ रोंगटे, नितीन चव्हाणके, राष्ट्रवादी युवा नेते शाम निसरड, सामाजिक कार्यकर्ते विशाल भोईर, अहिलाजी चौरे, कैलास माळी, संपत टोचे, स्वीय सहाय्यक डावरे आदी उपस्थित होते. ज्ञानेश्वर भोईर, संपत टोचे यांनी सूत्रसन्नचलन केले.

Similar Posts

error: Content is protected !!