रचना : जी. पी. खैरनार, नाशिक
९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१
राष्ट्रध्वजाचे गाऊ गुणगान !
नभी डोलती पताका छान !!
तिरंगा ध्वज आमची शान !
मनी पेटवी देशाभिमान !!
साऱ्या धर्माचे एकच स्थान !
भारत देश आमुचा महान !!
तिरंगा झेंडा असे बहुमान !
सारे भारतीय करी सन्मान !!
तिरंगा आमचा स्वाभिमान !
उरी जागवी देश अभिमान !!
साऱ्या धर्माचे आदर स्थान !
प्रिय देश असे हिंदुस्थान !!
तिरंग्याचा असे अभिमान !
लोक सेवेचे मिळे वरदान !!
भारत माता आमची महान !
आम्ही मातेचे सारे संतान !!
भारतीय सैनिक घेती आन !
तिरंगा आमुचा स्फूर्तीस्थान !!
भारत माता आमुचा प्राण !
तिला रक्षण्या देऊ बलिदान !!
सैनिक जागवी एकच रान !
देश रक्षण्या करी श्रमदान !!
शत्रू देशा गुप्त देऊन कान !
निष्प्रभ करी कटकारस्थान !!
भारतीय शूर वीरांची जान !
तिरंगा त्यांचे श्रद्धा स्थान !!
नभात डोलती तिरंगी पान !
सूर्य चंद्र सुद्धा दिसे लहान !!
शेता घेती बहू जाती वाण !
शेतकऱ्यांचा करु सन्मान !!
मुखी सारे गाऊ एकच गान !
जय जवान, जय किसान !!