इगतपुरीनामा न्यूज, दि. १५
घोटी ग्रामपालिकेच्या सफाईचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण आणि शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दुपारी 4 वाजता ही घटना घडली होती. याबाबत ग्रामपालिका कर्मचारी बाळकृष्ण काशिनाथ चिकने यांनी घोटी पोलिसांत फिर्याद दाखल केली.
फिर्यादीत नमूद असलेली थोडक्यात हकीकत अशी की, बाळकृष्ण काशिनाथ चिकने वय ३९ व्यवसाय – घोटी ग्रामपालिका सफाई कर्मचारी, रा. वाघेरे ता. इगतपुरी हे ग्रामपालिका कर्मचारी आहेत. आज घोटी येथील भंडारदरा रोडवरील गटारीच्या कामावरील खडी उचलण्याचे काम सुरू आहे. त्यातील कच उचलून हातगाड्यावर भरून बाळकृष्ण चिकने हे नेत असताना दुपारी 4 वाजता MH 15 DS 8654 ह्या वाहनातील संशयित इसम सुरेश माळी रा. मायाबाजार घोटी बुद्रुक याने बाळकृष्ण चिकने ह्या कर्मचाऱ्याशी वाद घातला. त्याला मारहाण करून शासकीय कामकाजात अडथळा आणला अशी फिर्याद घोटी पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानुसार भारतीय दंडविधान संहितेच्या कलम 353, 332, 506 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी तपास सुरू केला आहे.