इगतपुरी तालुका खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालकपदी खंडेराव शिवराम झनकर यांची निवड

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुका खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालकपदी खंडेराव शिवराम झनकर यांची निवड झाली आहे. खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा माजी आमदार शिवराम झोले, काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी जि. प. सदस्य गोरख बोडके, बाजार समिती संचालक ज्ञानेश्वर लहाने, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा बाजार समितीचे संचालक हरिदास लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलच्या विजयासाठी खंडेराव शिवराम झनकर यांनी मेहनत घेतली होती. त्याची दखल घेऊन त्यांची इगतपुरी तालुका खरेदी विक्री संघावर निवड करण्यात आली. धामणगाव खेड गटामधील शिवसैनिक, सर्वपक्षीय नेते शेतकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. सरपंच संतु साबळे, हरिभाऊ वाजे, मोहन बऱ्हे, पांडुरंग गाढवे, साहेबराव झनकर, रतन बांबळे, बाळासाहेब घोरपडे, राजाभाऊ घोरपडे, नामदेव साबळे, काशिनाथ कोरडे, रामचंद्र परदेशी, नवनाथ झनकर, समाधान वारुंगसे, भगवान जुंद्रे, कैलास गाढवे, नवनाथ बऱ्हे, भास्कर वाजे, शिवाजी काळे, सागर साबळे शरद जाधव, सरपंच शिवाजी गाढवे, ज्ञानेश्वर डमाळे ,गौतम भोसले, उपसरपंच पोपटराव लहामगे, बहिरू लगड, राधकिसन झनकर, सुरेश जुंद्रे, कमलाकर सांबरे, बहिरू केवारे, सुदाम भोसले, जनक भोसले, धोंडीराम गुंजाळ, शंकर चोथवे, नितीन गोडे, गणपत धोंगडे, नंदू भांगरे, रामदास धोंगडे, दत्तू भांगरे, उमाकांत खाडे, लक्ष्मण खतेले, भाऊसाहेब म्हस्के, शिवाजी तातळे, हिरामण कातोरे, मदन साबळे, भीमराव साबळे, विक्रम भांगे, दूंदा जोशी, नथु गांगड, संदीप भोसले, रघुनाथ आव्हाड, सुखदेव आव्हाड, रामदास गायकवाड, नामदेव घूमरे, राहुल गाढवे, भरत घूमरे, सरपंच गणेश टोचे, देविदास देवगिरे, भिका पानसरे, भरत गाढवे, भाऊसाहेब वाजे, रंगनाथ कचरे, बबन सांबरे, रामदास सांबरे, कैलास दरेकर, गोरख मदगे, पूनाजी सांबरे, संदीप झनकर, रतन झनकर, संतोष पवार, हेमंत झनकर, शिवाजी भोर, अंबादास बर्डे, सदाशिव गायकवाड, ज्ञानेश्वर भोर, पंडित गायकवाड, युवा गटप्रमुख मयुर भोसले आदींनी आनंद व्यक्त केला. लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनलच्या नेत्यांनी मला संधी दिल्याबद्दल ऋणी आहे. सर्वांचा विश्वास सार्थ ठरवून शेतकरी हिताचे काम करण्यासाठी सदैव कटीबद्ध आहे अशी प्रतिक्रिया खंडेराव शिवराम झनकर यांनी दिली.

स्पीडनेट इंटरनेट सोल्यूशन्स

इगतपुरी आणि घोटी मध्ये हाय स्पीड इंटरनेट, वायफाय सेवा

संपर्क साधा - 94222 14143
https://maps.google.com/?cid=8651594604110889001&entry=gps

Similar Posts

error: Content is protected !!