
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील खैरगांवची शिदवाडी भागातील जंगली भागात असलेले अवैधरित्या गावठी दारू बनवणारे २ अड्डे घोटी पोलिसांनी नष्ट केले आहेत. पहिल्या अड्डयावर १ लाख २५ हजार ६०० किंमतीचे, दुसऱ्या अड्डयावर ८४ हजार ७०० किमतीचे दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य व मुद्देमाल पोलीस पथकाने जागेवरच नष्ट केला आहे. घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील, आशिष रोही, पोलीस उपनिरीक्षक अनिल धूमसे यांच्या नेतृत्वाखाली केशव बस्ते, डहाळे, दिवे आदींनी ही धडक कारवाई केली आहे. ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, उपविभागीय पोलीस अधिकारी बाबुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी नितीन कटारे यांच्या फिर्यादीवरून पहिल्या घटनेत संशयित दिलीप शिद रा. शिदवाडी याच्यावर तर दुसऱ्या घटनेत संशयित एकनाथ शिद, कृष्णा शिद या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची चाहूल लागताच संशयित आरोपी जंगलात पसार झाले आहेत.